no problem in evm machine sharad pawar | Sarkarnama

मतमोजणीवेळी अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 जून 2019

मुंबई : "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड झाली,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. 

याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती दिली असून, त्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी देशभरातील मित्र पक्ष आणि इतर तज्ज्ञांशी बोलून याविषयी निर्णय घेणार असल्याचेही पवार या वेळी म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आज पक्षाकडून मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली होती, तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला. या समारोपाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

 पवार म्हणाले की, मतदान करताना ज्यावर बटन दाबले त्याची चिठ्ठी दिसते. त्यावर तुमचे समाधान झाले हे इथपर्यंत बरोबर होते. या दोन्हीमध्ये काही गडबड नव्हती. मला काही तज्ज्ञांनी याविषयी माहिती दिली; पण ज्या ठिकाणी मतमोजणीच्या ज्या मशीनमध्ये मतमोजणी झाली त्यात खरी गडबड झाली आहे.

मतमोजणी करताना एक अधिकारी मोजणी केंद्रात बसतो. त्या अधिकाऱ्याच्या समोर एक यंत्र असते. तिथे मशिनची मतमोजणी होते. या मशीन देशात दोनच कंपन्या बनवतात. याच कंपन्या यात सेटिंग करतात. हे सेटिंग्ज करायला आठ ते दहा लोक लागतात, त्यापेक्षा अधिक लागत नाहीत.

 हे लोक संबंध देशाचे काम काही तासांत करू शकतात, हे इतके सोपे आहे. यात आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप असून, याबाबत देशभरात राजकीय पक्षांकडून आवाज उठवला जात आहे. अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मतपत्रिकेवर मतदान घ्या; अन्यथा मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख