मुंबई पालिकेत प्लास्टिक बाटल्यांना मज्जाव

महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात अथवा कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक बाटल्यांचा वापर बंद करा, असा आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिला
Mayor Orders Plastic Ban in Corporation Building
Mayor Orders Plastic Ban in Corporation Building

मुंबई  : महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात अथवा कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्यावरणाला हानिकारक प्लास्टिक बाटल्यांचा वापर बंद करा, असा आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिला.

भायखळा येथील राणीच्या बागेत 31 ते 2 फेब्रुवारीदरम्यान महापालिकेने शोभिवंत झाडे, फुले, फळे व भाज्यांचे 25 वे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि महापौर व महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात व्यासपीठावर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या छोट्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. 

महापौरांनी त्या पाण्याच्या बाटल्या हटवण्याचे निर्देश दिले. यापुढे महापालिका कार्यालये आणि कार्यक्रमांत प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका, असा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्लास्टिकच्या बाटल्या हटवल्या. कार्यक्रमानंतर मान्यवरांना स्टीलच्या ग्लासांमधून पाणी देण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com