No one Ready To Accept Sixth Floor Two Number Cabin in Mantralaya | Sarkarnama

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन घेण्यास कोणीही धजेना; पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेस खतपाणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय एका बाजूला तर मुख्य सचिवासह सचिवांची दालने दुस-या बाजूला अशी रचना आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री कार्यालय आहे. मात्र, या दालनाचा मागील काही वर्षांत ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांचे राजकीय जीवनात अडथळे निर्माण झाले. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे दालन स्वीकारणे टाळले आहे

मुंबई : मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन घेण्यास उपमुख्यमंत्री अथवा मंत्री, राज्यमंत्री कोणीही तयार नाही. त्यामुळे मंत्रालयातील ते दालन घेण्यास कोणीही धजेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन कायदा राबवणा-या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रेद्धस खतपाणी घातले जाते का? याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे.

मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय एका बाजूला तर मुख्य सचिवासह सचिवांची दालने दुस-या बाजूला अशी रचना आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाजूलाच उपमुख्यमंत्री कार्यालय आहे. मात्र, या दालनाचा मागील काही वर्षांत ज्यांनी ज्यांनी वापर केला त्यांचे राजकीय जीवनात अडथळे निर्माण झाले. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे दालन स्वीकारणे टाळले आहे. यामुळे पवार हे मुख्य सचिवांचे दालन घेणार असल्याचे समजते. मुख्य सचिावांना लवकरच 602 या दालनात हलवण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी पहिल्या मजल्यावर तात्पुरते दालन स्वीकारले आहे. लवकरच पवार हे सहाव्या 

थोडसे 602 या दालनाविषयी

या दालनामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हे दालन देण्यात आले होते. खडसे यांचे मंत्रीपद लगेच गेले. त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना हे दालन देण्यात आले होते. मात्र, यांचाही हृदविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर कृषीमंत्री म्हणून अनिल बोंडे यांनी सूत्रे घेतली. मात्र बोंडे यांचाही पराभव झाला. 

या दालनाचे तीन भाग करण्यात आले होते. एका भागात कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउ खोत तर मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांची कार्यालये होती. खोतकर यांचा पराभव झाला तर सरकार गेल्यामुळे खोत यांचे मंत्रीपदही गेले. हे एक प्रकारचे अपशकुनी दालन असल्याची चर्चा मंत्रालयात पसरली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख