पुण्याच्या काकडेंवर कुणाचाच अंकुश चालत नाही

पुण्याच्या काकडेंवर कुणाचाच अंकुश चालत नाही

पुणे : पुण्याच्या काकडेंवर कुणाचाच अंकुश चालू शकत नाही. कारण आमच्यातही एक काकडे आहेत अशी शाब्दिक कोटी करीत देवेंद्र फडवणीस यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करून फडणवीस यांनी पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा संदर्भ दिला.

आपल्या भाषणात काकडे यांनी चंद्रकांत पाटील, ""तुम्ही इथे नसता तर आम्ही मोहोळ यांचा आमदार म्हणून सत्कार केला असता' असा टोला पाटील यांना लगावला. त्याचा समाचार घेताना फडणवीस यांनी आमच्याकडेही एक काकडे (खासदार संजय काकडे) आहेत. त्यामुळे काकडेंवर कुणाचाच अंकुश चालत नाही, अशी फटकेबाजी केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभात फडणवीस बोलत होते. मोहोळ यांनी महानगरपालिकेत नगरेसवक म्हणून चांगले काम केले आहे. आता ते महापौर आहेत. मात्र, ही तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मोहोळ यांच्या राजकिय कारकिर्दीची सुरवात असल्याचे फडणवीस यांनी म्हटल्याने मोहोळ यांच्या उज्वल राजकीय भवितव्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू झाली. गेल्या तीन वर्षात मोहोळ यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर कोथरूडमधून त्यांच्या आमदारकीच्या तिकिटाची चर्चा होती. त्यांना उमेदवारी जवळपास निश्‍चित होती, असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ऐववेळी पक्षाने रिंगणात उतरवल्याने मोहोळ यांची आमदारकी गेली. या पार्श्‍वभूमीवर मोहोळ यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात स्वत: फडणवीस यांनीच मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल भाष्य केल्याने त्याची चर्चा सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com