no onc can seize my love chagan bhujabal | Sarkarnama

माझ्यावरील प्रेम कोणी जप्त करू शकत नाही : छगन भुजबळ 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

पुणे : "" माझी सगळी संपत्ती जप्त केलीय, पण जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम कोणीही जप्त करू शकत नाही असे स्पष्ट करतानाच ओबीसी लढाई कदापी थांबणार नाही असा निर्धार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे काढले. 

पुणे : "" माझी सगळी संपत्ती जप्त केलीय, पण जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम कोणीही जप्त करू शकत नाही असे स्पष्ट करतानाच ओबीसी लढाई कदापी थांबणार नाही असा निर्धार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे काढले. 

बीड जिल्ह्यातील समता परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले,"" आज ओबीसींची लढाई थांबली आहे अशी चर्चा सुरु आहे. सरकार येतात आणि जातात पण ओबीसीच्या हक्कासाठी सुरु असलेली लढाई कधीही थांबणार नाही. आज ओबीसीच्या सर्व शिष्य वृत्ती बंद पडल्या आहेत. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून जे लढून मिळवलं आहे तेच आता मिळेना झालं आहे. समता परिषदेच्या पहिल्या मेळाव्याला एक लाख लोक उपस्थित होते ,तेव्हापासून ही लढाई गतीने सुरु आहे. कोणतंही सरकार आलं तरी ही लढाई थांबणार नाही ." 

"आज गुणवत्तेच्या बळावर पास होणाऱ्या उमेदवारांना नोकरी देताना जात विचारली जाते हे भयानक आहे.त्यांच्या गुणवत्तेची कदर केली जात नाही. मी आजवर जी भूमिका घेऊन लढत आलोय तीच भूमिका घेत लढत राहणार आहे. मला नामोहरम करण्यासाठी माझी संपत्ती जप्त केली पण माझ्यावर असलेले जनतेचे प्रेम जप्त करता येणार नाही "असे भुजबळ म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख