मेयोत कोरोना संशयीताचा मृत्यू, गेल्या दोन दिवसांत नाही एकही बाधित 

खामला येथील एक कोरोनाबाधित रुग्णालयात आल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील ८ जण बाधित झाले. कोरोना संशयित दगावल्यानंतर बाधित व्यक्ती रुग्णालयात येण्यास घाबरतात. तीच खळबळजनक स्थिती बुधवारी कोरोना संशयित व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिसून आली. समाधानाची बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नाही
One corona Patient Died in Nagpur Mayo Hospital
One corona Patient Died in Nagpur Mayo Hospital

नागपूर : खामला येथील एक कोरोनाबाधित रुग्णालयात आल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील ८ जण बाधित झाले. कोरोना संशयित दगावल्यानंतर बाधित  व्यक्ती रुग्णालयात येण्यास घाबरतात. तीच खळबळजनक स्थिती बुधवारी कोरोना संशयित व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिसून आली. समाधानाची बाब म्हणजे गेल्या दोन दिवसांत एकही नवीन कोरोना बाधित  आढळला नाही. 

इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयात (मेयो)  काल दुपारी मध्य प्रदेशातील सिवनी येथील सत्तर वर्षीय कोरोना संशयीत वृद्धाचा मृत्यू झाला.  या रुग्णाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले़. अहवालानंतर मृत्यूचे कारण पुढे येईल. तीन दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. नातेवाईकांनी त्यांना मध्यप्रदेशच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. श्वास घेतांना त्रास होण्यासह न्युमोनिया असल्याचे निदान झाले आहे.

कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगताच तातडीने त्यांना नातेवाईकांनी ३१ मार्चला नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलवले. येथील कोरोना संशयित वार्डात हलवले. दरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने प्रशासनाने येथील  प्रयोगशाळेत पाठवले आहेत.  उपराजधानीत २६ मार्च ते ३१ मार्च दरम्यान रोज कोरोनाग्रस्त आढळल्याने शहरातील रुग्णसंख्या १६ वर पोहचली आहे .  

मेयोत 30, मेडिकलात 25 संशयित दाखल

बुधवारी मेयोत दुपारी ४ वाजेपर्यंत कोरोनाची लक्षणे असलेले नवीन २० तर मेयोत ३ जणांना दाखल करत त्यांचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

१,२१५ जणांना घरात एकांतवास

विदेशातील प्रवासाचा इतिहास असलेल्यांसह कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने शहरातील सुमारे १,२१५ जणांना त्यांच्या घरातच खबरदारी म्हणून एकांतवासात राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. या सगळ्यांना त्यांचे कपडे व भांडी वेगळेच वापरण्यासह घरातील कुणाच्याही संपर्कात न येण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. काल दुपारपर्यंत सुमारे ३३७ जणांना आमदार निवासात विलगिकरण कक्षात ठेवले गेले आहे. शहरात आजपर्यंत करोनाचे १६ रुग्ण आढळले असून पैकी ४ जण बरे होवून परत गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com