No need to reply bankhele`s cheap criticism : Walase Patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चवथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर....
दौंड (पुणे) मध्ये आमदार राहुल कुल ६३३९ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

बाणखेलेंच्या फालतू टिकेला उत्तर देण्याची गरज नाही : वळसे पाटील

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मंचर : आमदार व मंत्री पदाच्या कालावधीत माझ्या शेजारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजाराम बाणखेले, अरुण गिरे बसत होते. त्यावेळी त्यांना माझी विकासकामे दिसत होती. पण आता पक्ष बदलल्यामुळे त्यांना विकासकामांचा विसर पडला आहे. हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

मी कधीही कोणाची निंदानालस्ती केली नाही. पक्षाची व केलेल्या कामांची भूमिका मांडण्याचे काम सतत केले आहे. जनतेचा पाठींबा व आशीर्वादाच्या जोरावर यावेळी मी विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंचर : आमदार व मंत्री पदाच्या कालावधीत माझ्या शेजारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राजाराम बाणखेले, अरुण गिरे बसत होते. त्यावेळी त्यांना माझी विकासकामे दिसत होती. पण आता पक्ष बदलल्यामुळे त्यांना विकासकामांचा विसर पडला आहे. हे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

मी कधीही कोणाची निंदानालस्ती केली नाही. पक्षाची व केलेल्या कामांची भूमिका मांडण्याचे काम सतत केले आहे. जनतेचा पाठींबा व आशीर्वादाच्या जोरावर यावेळी मी विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघात कळंब, पिंपळगाव, अवसरी खुर्द, गावडेवाडी येथे झालेल्या प्रचारसभेत वळसे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ते म्हणाले, "शिवसेनेचे उमेदवार सध्या दररोज शिमगा सण साजरा करत आहेत. यापूर्वी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील व माझ्यावर एक छापा तर दुसरा काटा अशी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करून टीका केली होती. राजाराम बाणखेले कधीही कोणाबद्दल चांगले बोलल्याचं ऐकवत नाही. त्यांच्या फालतू टीकेला उत्तर देण्याची गरज नाही. मतदानाची टक्केवारी वाढवून विक्रमी मताधिक्‍य निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) भूमिपूजन झाले. त्यावेळी फक्त डाव्या कालव्याच्या कामाची तरतूद होती. माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील, लोकनेते किसनराव बाणखेले, बी डी काळे यांनी मुख्यमंत्री पदावर असलेले शरद पवार साहेबांकडे मागणी केल्यामुळे उजवा कालवा मंजूर झाला. पण पुढे निधीअभावी धरणाचे व कालव्याचे काही काम रेंगाळले होते.

मी आमदार झाल्यानंतर कामाला गती आली. कालव्यांच्या कार्यक्षेत्रात नदीवर बंधारे बांधण्यास परवानगी नव्हती. खास बाब म्हणून मंजुरी मिळाल्याने घोड व मीना नदीवर 79 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. त्यापैकी 62 बंधारे 1990 नंतर झालेले आहेत. हा इतिहास विरोधकांनी तपासून पाहवा. इतिहासाची तोडमोड करणाऱ्या विरोधकांची कीव येते. किसनराव बाणखेले व माझ्या कधीही वैर नव्हते. किसनराव शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी होती. त्यावेळी किसनराव यांची शिफारस न करता. नाना बलकवडे यांची शिफारस राजाराम बाणखेले यांनी केली. बलकवडे यांचाच राजाराम यांनी प्रचार केला. किसनराव बाणखेले यांना मानसिक त्रास देण्याचे काम कुणी केले हे सर्वांना माहित आहे. त्यावेळी मंचरची अस्मिता का आठवली नाही, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी देवेंद्र शहा, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, वसंतराव भालेराव, (स्व) किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव रामदास बाणखेले, नातू युवराज बाणखेले, राजू इनामदार, उषा कानडे, प्रभाकर बांगर, शरद शिंदे, ज्ञानेश्वर गावडे उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख