...मालिकेत कुणाच्या सांगण्यावरुन बदल करण्याची आवश्यकता नाही : डाॅ. अमोल कोल्हे

राज्यरक्षक संभाजी मालिका अडीच वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नसल्याचे खासदार व अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांनी सांगितले
No Need to Change anything from Chatrapati Sambhaji Maharaj Serial Say Amol Kolhe
No Need to Change anything from Chatrapati Sambhaji Maharaj Serial Say Amol Kolhe

पुणे : ''स्वराज्यरक्षक संभाजी मालिका अडीच वर्षे  सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,'' असे खासदार व या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने केलेला अनन्वित छळ या भागाचे प्रसारण वगळण्यात येईल असे आश्वासन या मालिकेत संभाजी महाराजांचे पात्र साकारणारे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले आहे असा दावा शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. अमोल कोल्हे यांचा नुकताच आपल्याला फोन आला होता. त्यांनी माझ्या भावनांचा आदर करत छत्रपती संभाजी महाराजांचा छळ हा भाग मालिकेतून वगळण्यासाठी आपण चॅनल तसेच निर्मात्यांशी बोलून कुणाच्याही भावना दुखावतील असा कुठलाही प्रसंग मालिकेत दाखवणार नसल्याचे आश्वासन दिले आहे, असे खोतकर यांनी सांगितले होते. 

त्यावर डाॅ. कोल्हे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. मी खोतकर यांना फोन करुन आश्वासन दिले हे वृत्त चुकीचे आहे. माझे खोतकर यांचे बोलणे झाले. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका अडीच वर्षे  सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येण्याची काहीही शक्यता नाही. त्यामुळे चिंता करु नये, असे मी त्यांना सांगितल्याचे कोल्हे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com