संग्राम जगतापांना CID कडून दिलासा, तरीही टांगती तलवार कायम 

संग्राम जगतापांना CID कडून दिलासा, तरीही टांगती तलवार कायम 

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आमदार संग्राम जगताप व नगरसेवक बाळासाहेब भानुदास कोतकर यांची नावे नाहीत. त्यामुळे आज दिवसभर "आमदार जगताप यांना या गुन्ह्यातून वगळले' असा मेसेज फिरत होता. 

मात्र, दोघांचीही नावे वगळली नसून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी तपासासाठी आणखी अवधी मागितला आहे. त्यामुळे पुरवणी दोषारोपपत्रात त्यांची नावे येऊ शकतात. परिणामी, त्यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. "सीआयडी'च्या अधिकाऱ्यांनीही "कोणालाही वगळले जाणार नाही', असे सांगितले. 

दरम्यान, आरोपींना उद्या (शनिवारी) न्यायालयात आणण्याची शक्‍यता आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संग्राम संजय कोतकर यांच्या फिर्यादीवरून 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब एकनाथ कोतकर, भानुदास महादेव कोतकर, संदीप ऊर्फ जॉन्टी बाळासाहेब गिऱ्हे, रवींद्र खोल्लम, बाबासाहेब विठ्ठल केदार, महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळे, भानुदास एकनाथ कोतकर व नगरसेवक विशाल बाळासाहेब कोतकर यांना टप्प्या-टप्प्याने अटक केली. केदार याने हत्याकांडात वापर झालेले पिस्तूल पुरविल्याचे तपासात उघड झाले. 

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या भानुदास कोतकर व नगरसेवक विशाल कोतकर यांचाही या हत्याकांडात सहभाग असल्याचे तपासात पुढे आले. "सीआयडी'ने न्यायालयात आठ जणांविरुद्ध 1366 पानांचे दोषारोपपत्र सादर केले. मात्र, त्यात आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब कोतकर यांची नावे नाहीत. त्यामुळे दोघांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com