आता नेत्यांचीच मक्तेदारी नाही, नवरीचीही स्वतंत्र हेलीकॉप्टरने एन्ट्री  !

बेलवाडी गावमध्ये हेलीकॉप्टर आल्यानंतर नागरिकांनी हेलीकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
mla Bride & helicopter
mla Bride & helicopter

वालचंदनगर : लग्न समारंभांना मंत्री आमदार अनेकदा हेलिकॉप्टरने येतात पण आपल्या विवाहासाठी चक्क नवरी मुलगीही हेलीकॉप्टरमधून आल्याची घटना इंदापूर तालुक्यातील  बेलवाडी येथे रविवारी घडली .
 

आमदार दत्तात्रेय भरणे व आमदार यशवंत माने ज्या  विवाहसमारंभासाठी मुंबईमधून हेलीकॉप्टरमधून आले होते त्याच विवाह समारंभात नवरी मुलीचे स्वतंत्र हेलिकॉप्टरने आगमन झाले .
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार यांचा चिरंजीव अक्षय याचा  रविवारी  (ता.1) रोजी बेलवाडी गावामध्ये विवाहसमारंभ होता.

अक्षयचा विवाह करमाळा तालुक्यातील बिटरगांव मधील शिवाजीराव नामदेव पाटील यांची कन्या स्नेहल हिच्या सोबत आहे. या विवाहसमारंभासाठी स्नेहलचे आगामन बिटरगावमधून रविवारी  सकाळी खास  हेलीकॉप्टरने झाले.

 

बेलवाडी गावमध्ये हेलीकॉप्टर आल्यानंतर नागरिकांनी हेलीकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती.
 

 रविवारी  मुंबईमध्ये अधिवेशन सुरु होते. रविवारीच  इंदापूर तालुक्यामध्ये अनेक विवाहसमारंभ होते. सुवर्णयुग पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे यांचा मुलगा प्रवीण यांचाही सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विवाह होता. त्यामुळे जामदार व डोंगरे यांच्या विवाहासाठी आमदार दत्तात्रेय भरणे व आमदार यशवंत माने मुंबईहून हेलीकॉप्टरने आले होते . पण चर्चा  रंगलीती  नवरी मुलीच्या हेलिकॉप्टर एन्ट्रीची !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com