'कोरोना'मुळे अयोध्येत शरयू आरती नाही; उद्धव ठाकरे दर्शन घेऊन परतणार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेतली जात आहे. या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक जागी लोकांनी एकत्र जमू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातही बदल करण्यात आला आहे
No Mass Prayer in Uddhav Thackeray Ayodhya Tour
No Mass Prayer in Uddhav Thackeray Ayodhya Tour

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेतली जात आहे. या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सार्वजनिक जागी लोकांनी एकत्र जमू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातही बदल करण्यात आला आहे. 

उद्धव ठाकरे उद्या अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. काल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन या दौऱ्याच्या तयारीबाबत चर्चा केली. उद्धव ठाकरे दुपारी श्रीरामाचं दर्शन घेऊन, संध्याकाळी शरयू आरती करतील असे ठरले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्याचेही आवाहन शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. मात्र, कोरोनाच्या विषाणूच्या संसर्गाच्या भितीने लोक एकत्र जमणे योग्य नसल्याने सामूहिक आरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

29 नोव्हेंबर रोजी राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापना केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. याची घोषणा अगोदरच करण्यात आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com