no mahorty for bjp in maharastra | Sarkarnama

भाजपला स्वबळावर सत्ता नाहीच ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे : जरी शिवसेना-भाजप युती झाली तरी भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा भाजपच्या चाणक्‍यांकडून केला जात होता. मात्र एकटा भाजप बहुमताच्या जवळ जाऊ शकत नाही असा अंदाज एक्‍झीट पोलच्या आकडेवरून दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कुबड्या भाजपला घ्याव्याच लागणार आहेत. 

पुणे : जरी शिवसेना-भाजप युती झाली तरी भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा भाजपच्या चाणक्‍यांकडून केला जात होता. मात्र एकटा भाजप बहुमताच्या जवळ जाऊ शकत नाही असा अंदाज एक्‍झीट पोलच्या आकडेवरून दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कुबड्या भाजपला घ्याव्याच लागणार आहेत. 

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज एक्‍झीट पोलने व्यक्त केला आहे. 2014 च्या निवडणुकीचा विचार केला तर यावेळी युतीत भाजपपेक्षा शिवसेनेलाच अधिक फायदा होताना दिसत आहे. गेल्या वेळी मोदी लाटेतही शिवसेनेने स्वबळावर 63 जागा मिळविल्या होत्या. तर भाजपला 122 मिळाल्या होत्या. यावेळी दोन्ही पक्षाची युती झाल्याने महायुतीत शिवसेनेला चांगला फायदा होत असल्याचे दिसते आहे. 

शिवसेना-भाजपमध्येही कोणाला किती जागा मिळणार याकडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज चार वाहिन्यांनी केलेल्या अंदाजात भाजपला एकट्याला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. शिवसेना 63 वरून 80 ते 100 वर जाण्याची शक्‍यता आहे. 

2019 च्या निवडणुकीत भाजपने 164, शिवसेनेने 124 जागा लढविल्या होत्या. एकेकाळी मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने लहान भाऊ होत भाजपने दिलेल्या जागांवर समाधान मानले. यावेळी युती झाल्याने शिवसेनेच्या जागा वाढणार आहेत. जर शिवसेना 80 ते 100 च्या घरात पोचली तर या पक्षाला सत्तेतही अधिक वाटा मिळेल.

. एबीपी माझाच्या अंदाजानुसार भाजपला 140 तर शिवसेनेला 70 जागा आणि कॉंग्रेसला 31, राष्ट्रवादीला 32 आणि इतरांना 15 जागा मिळतील असा अंदाज आहे. 
सीएनएस न्यूज 18 ने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याची आकडे देताना भाजपला धक्का बसेल असे आकडे दिले आहेत. या वाहिनीच्या मते भाजपला 130, शिवसेनेला 113 कॉंग्रेसला 21, राष्ट्रवादीला 20 आणि इतरांना चार जागा मिळतील असे म्हटले आहे. 

इंडिया टुडेनुसार भाजपला 100, शिवसेनेला 66, कॉंग्रेसला 48, एनसीपीला 40 तर इतरांना 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर जन की बातची आकडे म्हणते की भाजप 135, शिवसेना 81, राष्ट्रवादी 41 कॉंग्रेस 24 आणि इतरांना सात जागा मिळतील. 

टाइम्स नाऊनुसार भाजपला 130 शिवसेनेला 100, राष्ट्रवादीला 20, कॉंग्रेसला 28 तर इतरांना 10 जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. तर टीव्ही भारत वर्षानुसार भाजपला 100, शिवसेनेला 97 कॉंग्रेसला 45, एनसीपीला 30 तर इतरांना 16 जागा मिळतील असा अंदाज आहे. या चार वाहिन्यांनी दिलेला अंदाज लक्षात घेतला तर भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक फायदा होताना दिसत आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख