No loan waivers in current assembly session | Sarkarnama

या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होणे अवघड

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 मार्च 2017

भाजपच्या "स्ट्रॅंटजी'नुसार मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना सबूरीचा सल्ला दिला असल्याचे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटावर वर सांगितले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यानच काय पुढचे दोन अधिवेशनही कर्जमाफी करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती ही या आमदाराने दिली.

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशामध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेतील कामकाज रोखून धरले आहे. त्यामुळे पहिल्या आठवडा आणि दुसऱ्या आठवड्याचे दोन दिवसाचे कामकाज पुर्ण होवू शकलेले नाही. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाजपचे आमदारही चांगलेच अक्रमक झाले आहेत. भाजपच्या "स्ट्रॅंटजी'नुसार मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना सबूरीचा सल्ला दिला असल्याचे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटावर वर सांगितले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यानच काय पुढचे दोन अधिवेशनही कर्जमाफी करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती ही या आमदाराने दिली.

मुख्यमंत्री आमदारांची काल सकाळी सकाळी शिकावणी वर्ग घेतला. या शिकवणी वर्गात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आधार देत सभाग्रहात विरोधकांविरोधात अक्रमक होण्याचे आदेशही दिले. विरोधकांनी जो काही कर्जमाफीच्या मागणीवरून गोंधळ घातला आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जावू नका. कर्जमाफी आत्ता केली तर त्याचा इँपॅक्‍ट सहा ते आठ महिने असतो. पुढे आपल्या निवडणुका आहेत. त्यामुळे याचा राजकीय फायदा होणार नाही. त्यामुळे आपण योग्य वेळी सरकार निर्णय घेईल. तुम्ही तुमचे काम करत रहा असा आश्‍वासक सल्ला मुख्यमंत्री भाजपच्या आमदारांनाल्याचे सुत्रांनी सांगितले.

भाजपच्या एका गटाने हजार पाचशे कोटी रूपये कर्जमाफी करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या कर्जाचे हजार कोटी रूपये व्याज भरावे अशी मागणी केली. या आमदारांच्या गटाच्या म्हणन्यानुसार कर्जाची फेररचना केल्यास शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न होणार असून भाजपबाबत शेतकऱ्यांची सहानभूती कायम राहील, असा दावाही या गटाने केल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शेतकरी कर्जमाफीचा विचार सध्या नसल्याचे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख