शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामात अनियमितता नाही : चंद्रकांत पाटील

...
chandrkant patil says no irregularities in shivaji memorial
chandrkant patil says no irregularities in shivaji memorial

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये अनियमितता अजिबात झालेली नाही. कुणाच्या फायद्यासाठी निविदा बदलण्यात आली नाही. ज्यांनी 15 वर्ष शिवस्मारक केले नाही, तेच आता पुन्हा ते होऊ नये, याच्या मागे लागलेले आहेत, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आरोप खोडून काढला.

पाटील म्हणाले, मुळात महाराजांचे स्मारक व्हावे, ही त्यांचीच इच्छा नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतलेले आहेत. त्यात इतरही सचिवांचा समावेश होता. स्मारकाचे काम आम्ही सुरू केले आहे. तरी अजून पेमेंट झालेले नाही. त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निविदेत सरकारचे पैसे वाचविले आहेत. 3800 कोटींची निविदा 2500 कोटींवर आणली. त्यात घोटाळा कसा, असा प्रश्‍नही चंद्रकात पाटील यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com