no invitation to raju shetty by udhav government | Sarkarnama

राजू शेट्टींना मंत्रिमंडळ विस्ताराचे साधे निमंत्रणही नाही ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मुंबई : ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण मित्रपक्षाना दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एकीकडे करीत असतानाच दुसरीकडे मला अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचे साधे निमंत्रणही मिळाले नाही अशी नाराजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. 

संग्राम थोपटे यांच्याप्रमाणेच शेट्टी हे ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री होणार असल्याची चर्चा होती आज मात्र मंत्रीपदासाठी त्यांचे नाव मागे पडलेच शिवाय त्यांना साधे मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रणही दिले गेले नाही असे समजते.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्याने प्रत्येक पक्षाच्या वाटेला अगदी कमी मंत्री येत असल्याने अनेक आमदारांचे स्वप्न भंगले आहे. राजू शेट्टी सारख्या नेत्याला मंत्री करून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस वेगळा संदेश राज्याला देतील असे बोलले जात होते. मात्र तसे काही होताना दिसत नाही. सत्ता येताच शेट्टींचा दोन्ही कॉंग्रेसला विसर पडू लागल्याची भावना शेट्टी समर्थकांमध्ये आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख