आता घाटगे गट नाही,भाजपा : चंद्रकांत पाटील 

 आता घाटगे गट नाही,भाजपा : चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर : आपण सगळे आता भाजपावासिय झालेला आहात, त्यामुळे घाटगे गट म्हणून आपण काम करायचे नाही असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला. 

गर्दीने खचाखच भरलेल्या अयोध्या हॉटेल येथील वृंदावन हॉलमध्ये हा कार्यक्रम झाल्या. फटाक्‍याची आतषबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये समरजितसिंह घाटगे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा माजी आमदार हाळवणकर यांनी केली. 

भाजपा महानगर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर कार्यकत्यांना मार्गदर्शन बोलताना पाटील बोलत होते. भाजपचे नेते समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते. 

समरजित घाटगे यांच्याकडे काम करण्याची चांगली दिशा आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात भाजपा मजबूत करण्यसाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत असेही पाटील म्हणाले. 

कोणाची जिरवायची नाही की, कोणाला गुडघे टेकायला लावायसाठी नाही,पण आपण भाजपा जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करण्यासाठीच यापुढे काम करु, हे काम आपण केले तर आपल्याला जी 90 हजार मते मिळाली आहेत,ती दीड लाखापर्यंतच सहजच जातील,असा विश्‍वास घाटगे यांनी व्यक्त केले. 

घाटगे म्हणाले,आपले कागल विद्यापीठ असले तरी देखील विक्रमसिंह घाटगे यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची कामे करण्याचे संस्कार आमच्यावर केले आहेत. त्यामुळे शेतकरी हितच आपण जोपासणार आहोत.

सध्या राज्यशासनाने केलेली कर्जमाफीतून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत.त्याचे निकषच चुकीचे आहेत. या निकषात अनेक शेतकरी बसतच नाहीत.त्यामुळे कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा,यासाठी येत्या कांही दिवसात मोठा मोर्चा आपल्याला काढावा लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com