काँग्रेसशी चर्चेची दारे बंद; 'एमआयएम' बरोबर अखेरपर्यंत चर्चा करणार : प्रकाश आंबेडकर

लोकसभेत काँग्रेस बरोबर युती व्हावी म्हणून प्रयत्न केले असता ते आम्हाला खेळवत राहिले, युती त्यांनी टाळली.आम्ही स्वतंत्र लढून ताकत दाखवली. आमची आता काँग्रेस सोबत बैठक झाली आणि व्यक्तिगतही बैठक झाली, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला. पण त्याचे उत्तर अजून आलेले नाही. आमची काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा नाही - प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

मुंबई : ''लोकसभेत काँग्रेस बरोबर युती व्हावी म्हणून प्रयत्न केले असता ते आम्हाला खेळवत राहिले, युती त्यांनी टाळली. आम्ही स्वतंत्र लढून ताकत दाखवली. आमची आता काँग्रेस सोबत बैठक झाली आणि व्यक्तिगतही बैठक झाली, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला. पण त्याचे उत्तर अजून आलेले नाही. आमची काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा नाही,'' असे सांगत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी चर्चेची दारे बंद केली आहे. मात्र, एमआयएमशी अखेरच्या फाॅर्मपर्यंत चर्चा सुरुच राहिल, असेही त्यांनी सांगितले आहे.

आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "आमचा या विधासभेत फूट बॉल होऊ नये म्हणून आम्ही युती करणार नाही. आम्ही आता उमेदवारांची यादी जाहीर करू. वेळ कमी आहे. 27 ऑक्टोबरला दिवाळी आहे असं आम्ही मानतो.आम्हाला प्रचाराला वेळ हवा आहे. एमआयएम बरोबर आमची युती आहे. ओवेसींकडून मला जी माहिती आली आहे, त्या नुसार आमचे शेवटच्या फॉर्म पर्यंत आमचे प्रयत्न सुरू असतील. आम्ही एकत्र आहोत. आम्ही इतर कोणी काही बोलत असतील त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही अध्यक्षांकडे सगळे ठरवतो,"

''आमची यादीत थोडे बदल होणार आहेत. एमआयएम बरोबर बोलताना असलेल्या अडचणींवर बोलणार नाही. माझी ओवेसींबरोबर  पुण्यात भेट झाली. डिप्लोमसी चा भाग आहे म्हणून मी म्हणतो की एमआयएम बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत बोलणी करत राहणार. आम्ही कायम एकत्र आहोत,'' असेही आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com