...त्यांचा संसार पहायला त्यांचा बाप आहे : मंत्रीमंडळ विस्तारावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर

आमच्या सरकारने अजित पवार यांच्या कुठल्याही फाईली क्लिअर केलेल्या नाहीत. जर त्या झाल्या असतील तर त्या आताच्या सरकारने केल्या असतील, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले
Our Government Didnt Cleared files of Ajit Pawar Claims Chandrakant Patil
Our Government Didnt Cleared files of Ajit Pawar Claims Chandrakant Patil

मुंबई : राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्याबाबत आज पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, "माझ्या बापाने मला स्वतःच्या संसारावर लक्ष ठेवायला शिकवले आहे. दुसऱ्याचा संसार पहायला त्यांचा बाप आहे," असे उत्तर त्यांनी दिले. अजित पवार यांच्या कुठल्याही फाईली आम्ही क्लिअर केलेल्या नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

आज भाजपची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत बोलताना पाटील म्हणाले, "काल एक तास आमची चर्चा झाली. त्यांचा जो आक्षेप आहे की त्यांच्या मुलीला पाडण्याचं काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले. या संदर्भाची आम्ही पुरावे मागवले आहेत. कुणी असे काही केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई नक्की केली जाईल. आम्ही आता जे काम करतोय ते त्यावेळी एकनाथ खडसे यांनी केले आहे. ते काम करतच नाथाभाऊ वर आले आहेत. त्यामुळे ते आमचे नेते आहेत''

अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लिन चीट दिली आहे. त्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, "भाजपने अजित पवारांनी क्लीन चिट दिलेली नाही. अजित पवार ज्यात दोषी आहेत अशा कोणत्याच फाईल भाजप सरकारने क्लियर केलेल्या नाहीत. जर त्या क्लियर झाल्या असतील तर त्या आताच्या सरकारने केल्या असतील.''

आजच्या बैठकीबाबत बोलताना पाटील म्हणाले, "मुंबईतील 36 मतदार संघातील आज बैठक होती. दर तीन वर्षांने संघटनात्मक निवडणूक होतात. पण यावेळी त्या विधानसभा निवडणुकीमुळे आणि सत्ता पेचामुळे या निवडणुका लांबल्या. त्यामुळे प्रत्यक विभागाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली आहे. आज मुंबई प्रदेश कार्यकाऱ्यांशी चर्चा केली. 2022 ची महापालिका निवडणूक आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढवणार आहोत. मुंबईचा महापौर भाजपचा व्हावा यासाठीही आज आम्ही चर्चा  केली.  मुंबईला जास्त वेळ देऊन 2022 च्या निवडणूक जिंकणे हे आमचे उद्धिष्ट आहे. 30 तारखे पर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. 30 तारखेला मुंबईच्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार आहे. 1 ते 5 जानेवारी पर्यंत प्रदेश अध्यक्षाचीही नेमणूक होणार आहे.'' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com