नागपूरमध्ये विधानसभेतील रंगत संपली; दोघांची माघार, दोघांना नकार

सुमारे दोन दशकांपासून निवडणुकीच्या आखाड्यात हमखास दिसणारे दिग्गज नेते यंदा रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांसोबतच मतदारांनाही चुकल्यासारखे होत आहे. याच कारणामुळे समर्थकांमधील खुन्नस नसल्याने निवडणुकीत अद्याप रंगत आल्याचे दिसत नाही.
Satish Chaturvedi - Anees Ahmed Nagpur
Satish Chaturvedi - Anees Ahmed Nagpur

नागपूर : सुमारे दोन दशकांपासून निवडणुकीच्या आखाड्यात हमखास दिसणारे दिग्गज नेते यंदा रिंगणात नसल्याने कार्यकर्त्यांसोबतच मतदारांनाही चुकल्यासारखे होत आहे. याच कारणामुळे समर्थकांमधील खुन्नस नसल्याने निवडणुकीत अद्याप रंगत आल्याचे दिसत नाही.

सुमारे वीस वर्षे सातत्याने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात सतीश चतुर्वेदी यांचा दबदबा होता. ते मंत्रिमंडाळात होते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री होते. नागपूरचा कुठलाही निर्णय त्यांच्या उपस्थितीशिवाय होत नव्हता. संपूर्ण कॉंग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या सभोवताल फिरत होते. माजी केंद्रीयमंत्री व खासदार विलास मुत्तेमवार यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे कॉंग्रेसमध्ये निवडणुकीच्या काळात प्रचंड खुन्नस बघायला मिळत होती. मात्र, सलग दोनवेळा झालेल्या पराभवामुळे यंदा सतीश चुतर्वेदी यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मध्य नागपूरमध्ये यंदा माजी मंत्री अनिस अहमदही दिसणार नाहीत. मध्य नागपूर सोडून पश्‍चिमेत गेल्यानंतर अहमद यांच्या मागे पराभवाचे शुक्‍लकाष्ठच लागले आहे. यंदा त्यांना पक्षाने उमेदवारीसुद्धा दिलेली नाही.

        राजेंद्र मुळक

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खास समजले जाणारे तसेच माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्यावरही नशीब रुसले आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. मात्र, पुनर्चनेत त्यांचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तेव्हापासून त्यांना हक्काचा मतदारसंघच मिळत नाहीये. ते नागपूर जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधानपरिषदेवर निवडून आले होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळात होते. त्यांनी पश्‍चिम नागपूरमधून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना शेवटच्या क्षणी कामठीत पाठवण्यात आले होते. येथे पराभव झाल्याने त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून रामटेकची निवड केली. तेथे घर घेऊन दोन वर्षांपासून पक्षबांधणी केली. मात्र त्यांना यंदा पक्षाने उमेदवारीच दिली नाही. 

      अभिजित वंजारी

अभिजित वंजारी राजकारणात कमनशिबी ठरले आहे. त्यांचे वडील दक्षिण नागपूरमधून निवडून आले होते. मात्र सत्तास्थापनेपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचे निधन झाले. त्यांनाच कॉंग्रेसची उमेदवारी द्यावी, अशी शिफारस तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभाताई राव यांनी केली होती. त्यांची उमेदवारी निश्‍चित मानल्या जात होती. मात्र स्थानिक नेतृत्वाने विरोध केला. त्यांच्याऐवजी दीनानाथ पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली.

वंजारी यांनी बंड पुकराले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. मागील निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात पाठवले. पराभव झाल्यानंतरही त्यांनी पूर्व नागपूरला सोडले नाही. लोकसभेतही सक्रिय होते. पुन्हा निवडणूक लढायचीच, असा संकल्प त्यांनी केला होता. मात्र कॉंग्रेसने यंदा त्यांच्या नावाचा विचारच केला नाही. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मागील निवडणुकीत लढण्याची हिंमत दाखवणारे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांनी यावेळी पक्षाकडे उमेदवारीच मागितली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com