शिवसेनेत यायचे तर लगेच या, आठ दिवसांनंतर 'नो एंट्री' : दादा भुसेंचे फर्मान

''ज्यांना कोणाला शिवसेनेत प्रवेश करायचा असेल त्यांनी तो लगेच करावा. मात्र आठ दिवसानंतर पक्षात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कार्यकर्त्यांनी देखील दलबदलू लोकांना अजिबात मदत करू नये," असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले.
 शिवसेनेत यायचे तर लगेच या, आठ दिवसांनंतर 'नो एंट्री' : दादा भुसेंचे फर्मान

मालेगाव  : ''ज्यांना कोणाला शिवसेनेत प्रवेश करायचा असेल त्यांनी तो लगेच करावा. मात्र आठ दिवसानंतर पक्षात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. कार्यकर्त्यांनी देखील दलबदलू लोकांना अजिबात मदत करू नये," असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले.

आज येथे झालेल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी उमेदवार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भुसे म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशहितासाठी व हिंदुत्वासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे विरोधकांची चागलीच धावपळ झाली. आपण सर्व नेत्यांचे आदेश मानणारे कार्यकर्ते म्हणून जोमाने काम करा. उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व आठही जागांवर शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार निवडून येतील. नार-पारचा पाण्यचा प्रश्न गिरीष महाजन मार्गी लावतील. मालेगाव जिल्हा होण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करा. दल बदलूंना तुम्ही मदत करू नका. आठ दिवस ज्यांना कोणाला यायचे त्यांना येवू द्या. आठ दिवसानंतर मात्र आपण प्रवेश देणे बंद करू. आपल्या परिश्रमाने विजयाचा गुलाल डाॅ.भामरे व आपल्या अंगावर पडेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com