no document requirement for NPR | Sarkarnama

'एनपीआर'साठी कागदी पुराव्यांची गरज नाही 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

मूळ प्रक्रिया राबविताना लोकांकडून कसलाही कागदी पुरावा अथवा बायोमेट्रिक पद्घतीने त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार नाही.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीसाठी (एनपीआर) कोणतेही अधिकृत दस्तावेज अथवा बायोमेट्रिक पुरावे घेतले जाणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले. तत्पूर्वी, पश्‍चिम बंगालप्रमाणेच अन्य काही राज्यांनी याला आक्षेप घेतला होता. 

'एनपीआर'संदर्भात लोकांकडून माहिती मागविण्यासाठीची प्रश्‍नावली असणारा एक फॉर्म तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मूळ प्रक्रिया राबविताना लोकांकडून कसलाही कागदी पुरावा अथवा बायोमेट्रिक पद्घतीने त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार नाही. दरम्यान, रजिस्ट्रार जनरल आणि लोकसंख्या आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीमध्ये मात्र संबंधित नागरिकांची भौगोलिक तसेच बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार असल्याचे म्हटले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख