No Difference Between Me and Girish Mahajan Claims Eknath Khadse | Sarkarnama

गिरीश महाजन व माझ्यात मतभेद नाहीत- एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

काल सायंकाळी साडेसहा च्या सुमारास खडसे साईदर्शन घेतले. साईसंस्थान चे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण व महाजन यांच्यात मतभेद नसल्याचा दावा केला. 

शिर्डी : काही बातम्या फक्त पत्रकारांकडेच असतात. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माझ्यात कसलेही मतभेद नाही. तसे असते तर जळगाव महानगरपालीका जिंकली नसती, अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी काल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केली.

काल सायंकाळी साडेसहा च्या सुमारास त्यांनी येथे येऊन साईदर्शन घेतले. साईसंस्थान चे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. 

तुम्हाला मुख्यमंत्रीच काय, परंतु; पंतप्रधान देखील व्हावेसे वाटेल असे विधान मंत्री महाजन यांनी केले होते. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माझ्या दृष्टीने हा विषय केव्हाच संपला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख