रेड लाईट एरियातही शुकशुकाट....ग्राहक फिरकेना

....
red light area
red light area

सोलापूर : जगभर हातपाय पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा देहविक्रीवर परिणाम झाला आहे. "कोरोना'च्या भीतीने ग्राहक येत नसल्याचे वारंगणा सांगत आहेत.

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, उत्सवावर बंदी घातली आहे. याचा परिणाम राज्यातील अनेक व्यवसायांवर झाला आहे. अतिशय वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसची भीती ग्रामीण भागातही निर्माण झाली आहे. पोल्ट्री व्यवसाय, मंगल कार्यालये, लग्न समारंभ, उत्सवासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर "कोरोना'चा परिणाम जाणवत आहे. त्यातच आता देहविक्रीच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. मात्र, याबाबत समोर येऊन कोणीही थेट बोलायला तयार नाही.

देहविक्री करणाऱ्या वारंगणाकडे कोठूनही आलेले ग्राहक असतात. शरीराची भूक भागवण्यासाठीही आता "ते' पुरुष जात नसल्याचे समोर आले आहे. देहविक्री चालणाऱ्या काही ठिकाणी "सकाळ'ने मंगळवारी (ता. 17) चाचपणी केली. तेव्हा व्यवसायावर मोठ्याप्रमाणावर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.

एका देहविक्री करणाऱ्या महिलेने सांगितले, की आमचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. कोणाला कसला आजार आहे, हे आम्हाला माहीत नसते. आम्ही त्याच्याकडे कधी विचारणाही करत नाही. जो कोण असेल तो आमचा ग्राहकचं. मात्र, याचा काही दिवसांपासून परिणाम जाणवत आहे.

शरीराची भूक भागवण्यासाठी येणाऱ्यांचा कधी वेळ नसतो. कोण कधी येईल याचे काही सांगता येत नाही. मात्र, कोरोना व्हायरसची जेव्हापासून तीव्रता वाढली आहे तेव्हापासून येणाऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. येथे येणारे कोठून येतात हे सांगता येत नाही. देहविक्री करणाऱ्या महिलेशी अनेकांची जवळीक आलेली असते. त्या भीतीतून ग्राहक येत नसेल असं वाटतं, असं एकाने सांगितले. "कोरोना'बाबत घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यायला पाहिजे.

"कोरोना'मुळे अनेक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. देहविक्री हा एक व्यवसाय वाटत असलं तर यावर अनेकजणांचे कुटूंब अवलंबून असते, त्यावर याचा परिणाम होत आहे, असेही तेथील एकाने "सकाळ'ला सांगितले. याबाबत एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनीही परिणाम झाला असल्याचे सांगत स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com