भुजबळ- अजित पवार चर्चेत अंतीम निर्णय नाहीच

आज वळसे पाटील, भुजबळ यांनी सकाळी अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे चार चास ही बैठक सुरु होती. मात्र, त्यातून अद्याप तरी काही फलनिष्पत्ती झालेली नाही.
No Conclusion yet in Chagan Bhujbal and Ajit Pawar Meeting
No Conclusion yet in Chagan Bhujbal and Ajit Pawar Meeting

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची समजूत घालण्याचे कसोशीचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरु असून आज छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, या चर्चेत अंतीम निर्णय झाला नसल्याचे भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र, त्यातून काहीच समोर येत नव्हते. त्यातच अचानक अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला. त्यानंतर न्यायालयात जाण्यापासून सर्व मार्ग काँग्रेस-शिवेसेना - राष्ट्रवादी कडून अवलंबले जात आहेत. अजित पवार यांना पुन्हा वळवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. 

आज वळसे पाटील, भुजबळ यांनी सकाळी अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे चार चास ही बैठक सुरु होती. मात्र, त्यातून अद्याप तरी काही फलनिष्पत्ती झालेली नाही. याबाबत बैठक संपल्यानंतर भुजबळ म्हणाले, " आम्ही अजित पवारांची भेट घेतली.  खूप वेळ चर्चा केली, काही मार्ग निघेल का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही.  मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही." यातून सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली. घर तुटता कामा नये, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com