सावनेरमध्ये आमदार सुनील केदारांना `नो चॅलेंज'

जिल्ह्यातील कामठी आणि उमरेड विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असताना सावनेर मतदारसंघ यास अपवाद आहे. येथे आमदार सुनील केदार यांच्याशिवाय एकाही उमेदवाराने पक्षाकडे लढण्याची इच्छा दर्शवलेली नाही. तसेच साधा अर्जही घेण्याची हिंमत दाखविली नाही.
सावनेरमध्ये आमदार सुनील केदारांना `नो चॅलेंज'

नागपूर : जिल्ह्यातील कामठी आणि उमरेड विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असताना सावनेर मतदारसंघ यास अपवाद आहे. येथे आमदार सुनील केदार यांच्याशिवाय एकाही उमेदवाराने पक्षाकडे लढण्याची इच्छा दर्शवलेली नाही. तसेच साधा अर्जही घेण्याची हिंमत दाखविली नाही. 

सुनील केदार 1995 पासून सातत्याने सावनेरमधून निवडून येत आहेत. मोदी लाटेतही ते पराभूत झाले नाहीत. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यामुळे त्यांची लढत शिवसेनेच्या उमेदवाराशी झाली होती. 

जिल्ह्यातील सावनेरवगळता सर्व 11 विधानसभेत भाजपचे उमेदवार निवडून आले. भाजपचा उमेदवार असता तर सावनेरही जिंकले असते, अशा चर्चा आजही येथे झडतात. तुलनेत कमकुवत उमेदवार तसेच भाजपची मनापासून साथ नसतानाही केदार थोडक्‍यात बचावले. असे असतानाही कुठल्याच दुसऱ्या उमेदवाराने सावनेरमध्ये दावा करण्याची हिंमत दाखविली नाही. यावरून केदरांचे वर्चस्व दिसून येते. तसेच त्यांना पर्यायसुद्धा दिसत नसल्याचे स्पष्ट होते. 

आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून कॉंग्रेस पक्षातर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. कामठी विधानसभा मतदार संघात दावेदारांची सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी आपला बालेकिल्ला केला आहे. त्यांनी सलग तीन निवडणूक जिंकून ते सिद्ध केले आहे. ऊर्जा, अबकारी अशी महत्वाच्या खात्याचे ते मंत्री आहेत. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत. येथे निवडून येणे अवघड आहे, असे कॉंग्रेसचे नेते खासगीत बोलतात. 

असे असले तरी येथून आबिद काजी, प्रसन्न तिडके, नाना कंभाले, तापेश्‍वर वैद्य, महादेव जिभकाटे, हुकुमचंद आमधरे, विनोद मिसाळ, आशिष चव्हाण, फिरोज अहमद अंसारी यांनी आपली दावेदारी दाखल केली आहे. 

उमरेडमधून संजय मेश्राम, महादेव नगराळे, नत्थु लोखंडे, राहूल घरडे, प्रमोद घरडे, राजेश मेश्राम, गजानन जांभुळकर, विश्‍वनाथ मेंढे, राजू पारवे, जॉनी मेश्राम, प्रशांत ढाकणे, यशवंत मेश्राम, रामटेक मधून सुरेश कुमरे, दीपक पालीवाल, गज्जू यादव, चंद्रपाल चौकसे, सचिन किरपान, हिंगणा येथून कुंदा राऊत, बाबा आष्टणकर यांनी अर्ज घेऊन लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com