कोल्हापुरातील 'ते' दोन मृत्यू 'कोरोना'ने झालेले नाहीत!

वरील दोन्ही मृत व्यक्तींचे स्वॅबचे अहवाल आज बुधवारी सीपीआर प्रशासनास प्राप्त झाले. दोन्ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.
no any death due to corona virus says CPR administration
no any death due to corona virus says CPR administration

कोल्हापूर : येथील सीपीआर रूग्णालय व खासगी रूग्णालयात काल मंगळवारी एकाच दिवशी दोन कोरोना संशयित व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यांचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले होते त्याचा कोरोना तपासणीचा अहवाल आज निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तीचा मृत्यू कोरोना मुळे झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी माहिती सिपीआर प्रशासनाकडून देण्यात आली.

कोल्हापूर शहरातील कदमवाडी परिसरातील एका खासगी रूग्णालयात 81 वर्षाच्या आजींवर उपचार सुरू होते. त्यांना हृदयविकारांची लक्षणे दिसत होती. त्यांच्या काल मृत्यू झाला. तरीही खबरदारीचा भाग म्हणून त्यांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविले होते. हातकणंगले तालुक्‍यातील दुसरा एक तरूण गेली दोन दिवस खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. त्यांनाही गंभीर अवस्थेत सीपीआर रूग्णालयात कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचाही स्वॅब कोरोना तपासणीसाठी पुण्याला पाठवला होता. त्यानंतर या तरूणाचा सीपीआरच्या कोरोना विलगीकरण कक्षात मृत्यू झाला.
 
वरील दोन्ही मृत व्यक्तींचे स्वॅबचे अहवाल आज बुधवारी सीपीआर प्रशासनास प्राप्त झाले. दोन्ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यांना कोरोना झाला नसल्याचे स्पष्ठ झाले आहे असे डॉ. उल्हास मिसाळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com