नागपूर लढतींचे चित्र आज स्पष्ट होणार 

लढतींचे चित्र आज स्पष्ट होणार
लढतींचे चित्र आज स्पष्ट होणार

नागपूर : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या लढतींचे चित्र आज दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसच्या काही उमेदवारांना एकाच प्रभागात दोन एबी फॉर्म मिळाल्याने निवडणूक अधिकारी या घोळावर आजच उतारा देतील. 

कॉंग्रेस व भाजपमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाल्याने अद्यापही शहरातील लढतींचे चित्र स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू आहे. भाजपच्या काही ज्येष्ठांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिल्याने भाजपपुढील अडचणीत वाढ होणार, हे स्पष्ट झाले आहे. अखेरच्या क्षणापर्यंत बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावे, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. आज दुपारी हितेश जोशी यांनी उमेदवारी मागे घेऊन भाजपची अडचण दूर केली आहे. 

कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाली. या सोबतच काही प्रभागांमध्ये दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने घोळ आणखी वाढला आहे. प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 व 9 मध्ये दोन-दोन उमेदवारांना कॉंग्रेसचे एबी फॉर्म मिळाले आहेत. एकाच प्रभागात दोघांना कॉंग्रेस पक्षाचे एबी फॉर्म मिळाल्याबद्दलचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. दोघांपैकी एकाने माघार घेतल्यास दुसरा आपोआप कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार होईल. परंतु दोघांनीही उमेदवारी कायम ठेवल्यास एकाला बंडखोर म्हणून लढावे लागणार आहे. याबद्दलचे चित्र आज रात्रीच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com