खासगी क्षेत्रात आरक्षण लागू  करावे  -   नितीशकुमार - Nitishkumar says reservation in private sector is must | Politics Marathi News - Sarkarnama

खासगी क्षेत्रात आरक्षण लागू  करावे  -   नितीशकुमार

उज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पाटणा     : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची भूमिका घेत त्याबाबत देशव्यापी चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

 आज जागतिकीकरणाच्या काळात सामाजिक न्याय हे केवळ चेष्टेचा विषय न राहायला नको, त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्याबाबत विचार होण्याची गरज आहे. 

  मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, चौदाव्या  लोकसभेत आपण दलित मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. दलित बुद्धिस्ट, दलित शीख यांना याचा लाभ मिळत आहे; परंतु दलित मुस्लिम यापासून वंचित आहेत.

 आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून नितीशकुमार यांनी आपला सामाजिक आधार मजबूत केल्याचे मानले जात आहे. आउटसोर्सिंगद्वारे देण्यात येणाऱ्या नियुक्‍त्यांमध्ये आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाला नितीशकुमार सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे.

 ज्या संस्थांना सरकारची आर्थिक मदत मिळते तेथे कर्मचारी नियुक्तीमध्ये आरक्षण नियम लागू करावाच लागेल. राज्यात दहा हजार जण आउटसोसिंगवर काम करीत आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख