nitishkuamar | Sarkarnama

सर्व समाजवाद्यांनी एकत्र यावे : नितीशकुमार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई ः छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महापुरुषांनी देशाला मार्ग दाखवला आहे, त्याच राज्यातून देशातील समाजवाद्यांच्या एकजुटीला सुरूवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्व समाजवादी, कामगार, कष्टकरी, 
छात्र, शिक्षक, महिला आणि शेतकरी जनता दलाच्या झेंड्याखाली एकत्र यावे असे आवाहन जनता दलाचे (संयुक्त) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत केले. 

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को ग्राउंडवर जदयु महाराष्ट्र प्रदेश संमेलन आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत 
होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्‍याम रजक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव अखिलेश कटियार, शायर हसन कमाल, महाबळ शेट्टी आदी उपस्थित होते. 

नीतिशकुमार म्हणाले की, विरोधी पक्षांच्या व्यापक एकजुटीतूनच नकारात्मक विचारांच्या लोकांना उत्तर मिळेल. प्रेम, भाईचारा, सहिष्णुता, 
सामाजिक न्याय हा आपला रस्ता आहे. गांधी, आंबेडकरांचे विचार देशाला मार्ग दाखवतील, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील महापुरुषांनी देशाला मार्ग दाखवला आहे, असे सांगत पानीवाली बाई मृणालताई गोरे यांची आठवण येते. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या कामगार चळवळीचा त्यांनी गौरव करून ते म्हणाले, "" जॉर्ज यांची लढाऊ परंपरा पुढे कामगार नेते शरद राव यांनी चालविली. तसेच समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मधू लिमये या महाराष्ट्रातल्या नेत्यांमुळेमी विद्यार्थी दशेत घडलो. 

बॅंक कर्मचारी-अधिकाऱ्यांचे नेते विश्वास उटगी, माथाडी कामगार नेते अविनाश रामिष्टे, निवृत्त आयएएस अधिकारी जयंत गायकवाड, डॉल्फी डिसोझा, आदिवासी विद्यार्थी नेता सुनील तोतावाड, शीख समुदायाचे नेते मलविंदरसिंह खुराणा, विजयभाई लालवाणी, फारुखभाई, फिरोज मिठीबोरवाला यांनी प्रवेश केला. दरम्यान, जनता दल(संयुक्त) महाराष्ट्र अध्यक्षपदी कपिल पाटील यांची तर मुंबईच्या अध्यक्षपदी 
शशांक राव यांची नियुक्‍ती करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख