नितीशकुमार भाजपत प्रवेश करणार होते : जया जेटली 

 नितीशकुमार भाजपत प्रवेश करणार होते : जया जेटली 

कोलकाता : "" लालूप्रसाद यादव यांना नितीशकुमार इतके कंटाळले होते की ते थेट भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यावेळी जॉर्ज फर्नाडीस यांनी समता पक्षाची स्थापना केली आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यानेच ते थांबले, असा गौप्यस्फोट समता पक्षाच्या नेत्या आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडिस यांच्या अत्यंत निकटवर्ती जया जेटली यांनी केला आहे. 

जेटली यांचे "लाइफ अमंग स्कॉरपिअन्स' आत्मकथन लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांनी नितीशकुमार यांच्यासह मुलायमसिंह यादव, शरद यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्यावरही निशाना साधला आहे. या पुस्तकातील काही भाग सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे. जॉर्ज फर्नाडिस यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी नितीशकुमार यांनाही जेटली यांनी सोडले नाही. पंतप्रधान वाजपेयींचा कार्यकाळ आणि उत्तरप्रदेश, बिहारचे राजकारण तसेच समाजवादी चळवळीविषयी त्यांनी या पुस्तकात आठवणींना उजाळा दिला आहेत. 

"" आम्ही जर समता पक्षाची स्थापना केली नसती तर आज तुम्हाला नितीशकुमार यांना भाजपचे नेते म्हणून पाहावे लागले असते. नितीशकुमार हे अत्यंत स्वार्थी नेते आहेत. ते नेहमीच स्वत:च विचार करतात. जॉर्ज फनॉडिससाहबांनी जेंव्हा मला राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला तेंव्हा त्यांनी मला तिकीट न देता उद्योगपती महेंद्र प्रसाद यांना तिकीट दिले आणि राज्यसभेवर पाठविले.'' असा जेटली यांचा दावा आहे. 

लालूप्रसाद यादव आणि शरद यादव हे केवळ भाषण देण्यासाठी समाजवादी आहेत. वास्तवात मात्र त्यांना समाजवादी म्हणावे असा एकही गुण त्यांच्यात नाही. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि मधु लिमये हे महान नेत्यांची विचारसरणी आणि त्यांचे राहणीमानही समाजवादी होते. मात्र, लालूप्रसाद आणि शरद यादव हे त्यांच्या व्याखेत कोठेच बसत नाहीत. जर लोहिया, जेपी आणि लिमये आज असते तर या तीन यादवांना त्या तीन महान नेत्यांनी एक क्षणभरही सहन केले नसते. 

तीन यादवांसह नितीशकुमार यांच्यावरही निशाना साधला असताना या चौघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मात्र त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. जेटली म्हणतात, "" मोदी यांना स्पष्ट बहुमत मिळूनही ते आपल्या सहकाऱ्यांना आणि घटकपक्षांना बरोबर घेऊन चालता आहेत. मोदी विरोधकांचीही भेट घेतात. चर्चा करतात. गुजरातमध्ये त्यांनी खूप काम केले आहे. गुजरातचा त्यांनी सहजपणे विकास केला. राज्याचा चेहराच बदलला. मात्र देशातील अच्छे दिन आणि झालेला बदल काही लोकांना अद्याप रूचलेला नाही. '' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com