40,000 कोटी वळवले, `दाल में कुछ काला है' : नितीन राऊत

80 तासांच्या कार्यकाळात 40 हजार कोटी रुपये केंद्राला वळते केल्याच्या भाजपच्याच खासदाराच्या आरोपावर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा करावा. कारण त्यांच्याच पक्षाचा एक जबाबदार नेता हे बोलला असल्याने `दाल मे कुछ काला है' असे मंत्री नितीन राऊत म्हणाले.
40,000 कोटी वळवले, `दाल में कुछ काला है' : नितीन राऊत

नागपूर ः 80 तासांच्या कार्यकाळात 40 हजार कोटी रुपये केंद्राला वळते केल्याच्या भाजपच्याच खासदाराच्या आरोपावर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर खुलासा करावा. कारण त्यांच्याच पक्षाचा एक जबाबदार नेता हे बोलला असल्याने `दाल मे कुछ काला है' असे मंत्री नितीन राऊत म्हणाले. 

"मै समुंदर हुं, लौटकर आऊंगा', या फडणवीसांच्या वक्तव्यावर "अब समुंदर ही बताएगा की कौन लौटकर आएगा और कौन प्रस्थापित है. कारण विधानसभेत आम्ही आमची ताकद दाखवली', असेही ते म्हणाले.

पाच वर्षांच्या आपल्या कार्यकाळात भाजपने फक्त थापा मारण्याचे काम केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्यांनी विदर्भाचा विकास केला नाही आणि विदर्भही स्वतंत्र केला नाही, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला. 

सरकारने विश्‍वासमत जिंकल्यानंतर राऊत प्रथमच आज नागपूरला आले. त्यांनी दीक्षाभूमीला अभिवादन केले. येथेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

विरोधात असताना भाजपने नेहमीच स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार केला. यासाठी आंदोलने केली. केंद्रात व राज्यात सत्ता आल्यास विदर्भाचे वेगळे राज्य करून अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी वारंवार जाहीर केले होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरला जाईल, सर्व प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. भाजपने फक्त थापा मारण्याचेच काम केले.

शेतकरी आणि ओबीसींसाठी झटणारे नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष व आपल्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यास पहिल्याच मंत्रिमंडळात सामावून घेऊन कॉंग्रेसने समतेचा संदेश दिला. आमचे सरकार स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्त्वावर पाच वर्षे चालणार असल्याचा विश्‍वास राऊत यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत जाहीर केली जाणार आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. राज्यावर चार लाख 31 हजार कोटींचे कर्ज आहे. याशिवाय आणि दोन लाख कोटींचे, असे एकूण सहा लाख कोटींचे कर्ज आहे. यावर श्‍वेतपत्रिका काढण्यात येणार असून त्यात कर्जातून बाहेर पडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपयायोजनेंचाही समावेश राहणार आहे.

युती सरकारच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे आश्‍वासन दिले होते. त्यांनी भगवी पत्रिकाही काढली होती. हीच भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. त्यांच्याकडून विदर्भाला मोठ्या अपेक्षा आहेत. येथील रखडलेले सिंचन विकासाचे प्रकल्प ते पूर्ण करीत अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com