आजचा वाढदिवस : नितीन राऊत, माजी मंत्री - nitin raut ex minister | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : नितीन राऊत, माजी मंत्री

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

उत्तर नागपूर मधून नितीन राऊत तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. नागपुरातील अत्यंत विपरीत परिस्थितीतून कॉंग्रेस पक्षाचे मूळ उत्तर नागपूर मतदारसंघात घट्ट करण्यात नितीन राऊत यांचा वाटा मोठा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. उत्तर नागपूर हा दलित बहुल भाग असला तरी तेथे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव राहिल्याने कॉंग्रेसला फारसे यश मिळत नव्हते. उच्च विद्याविभूषित असलेल्या नितीन राऊत यांनी डॉक्‍टरेट मिळविली आहे. नागपुरात होणारे बौद्ध थीम पार्क, लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे.

उत्तर नागपूर मधून नितीन राऊत तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. नागपुरातील अत्यंत विपरीत परिस्थितीतून कॉंग्रेस पक्षाचे मूळ उत्तर नागपूर मतदारसंघात घट्ट करण्यात नितीन राऊत यांचा वाटा मोठा आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. उत्तर नागपूर हा दलित बहुल भाग असला तरी तेथे रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव राहिल्याने कॉंग्रेसला फारसे यश मिळत नव्हते. उच्च विद्याविभूषित असलेल्या नितीन राऊत यांनी डॉक्‍टरेट मिळविली आहे. नागपुरात होणारे बौद्ध थीम पार्क, लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यात राऊत यांनी मोठी भूमिका बजावली आहे. ते सामाजिक कामातही अग्रेसर असून धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी येणाऱ्या बौद्ध अनुयायांना भोजन देण्याचा उपक्रम ते सातत्याने राबवत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख