`इतर पंतप्रधान उपचार शोधत आहेत, तर मोदी मेणबत्या पेटवायला सांगताहेत'

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आजच्या आवाहनावर सडकून टीका केली आहे.
nitin raut criticised modi on 5th april event at 9 pm 9 minutes
nitin raut criticised modi on 5th april event at 9 pm 9 minutes

पुणे - राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आजच्या आवाहनावर सडकून टीका केली आहे. टाळ्या वाजवून, मेणबत्त्या पेटवून आपण कोरोनाला हरवणार, अशी उपरोधिक टीका त्यांनी मोदींवर केली आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की जगातले इतर राष्ट्रांचे पंतप्रधान कोरोनावर उपचार शोधत आहेत आणि त्यातून लढण्याची व्यवस्था करत आहेत. त्याचवेळी आपले पंतप्रधान कधी टाळी वाजवून घेताहेत, तर कधी मेणबत्ती पेटवायला सांगताहेत. 

`यातून आपण कोरोनाविरुद्ध जिंकू' अशी उपरोधिक टीकाही राऊत यांनी मोदींवर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com