nitin nandgaonkar assures supriya sule | Sarkarnama

सुप्रिया सुळेंना नांदगावकरांचा शब्द : सोळाव्या दिवशी काय होईल ते पाहा!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानका दरम्यान ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. आपल्या टॅक्सीमध्ये बसावं म्हणून एका एजंटने त्यांचा रस्ता अडवत गैरवर्तन केल्याचा तक्रारार सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. या प्रकरणाची मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी देखील दखल घेतली आहे.

सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या. एकही टॅक्सीवाला किंवा दलाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही, अशा शब्दांत त्यांनी हा विषय हाती घेण्याचे नमूद केले आहे.

मुंबईत रोज रेल्वे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मवरती टॅक्सी चालक आणि त्यांचे दलाल ट्रेन मध्ये जबरन घुसून महिला-पुरुष प्रवाशांना त्रास देत असतात. तेही बिना लायसेन्स, बिना तिकीट बिना परवाना रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून बिनदास्त दिवस-रात्र आपले सावज शोधत असतात आणि त्यासाठी रेल्वे पोलिसांना आणि इतर विभागांना मिळतो त्याचा मोबदला म्हणजेच हप्ता, असा आरोप त्यांनी केला आहे. 

दलाल आणि टॅक्सी चालक प्लॅटफॉर्मवर येणार नाहीत यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीस जागे व्हावे नाहीतर आम्हीं रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलो आणि दलाल सापडले तर मात्र त्यानंतरची जवाबदारी तुमची राहील. जिथे जिथे महिलांच्या मानसन्मानाला ठेच पोचेल तिथे तिथे अशा समाजकंटकांना सोडणार नाही. १५ दिवस रेल्वे प्रशासनाला दिले त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अन्यथा १६ वा दिवस फक्त माझा असेल, असा इशारा नांदगावकरांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख