भाजपच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे

दुपारी एक वाजता होणारी निवड प्रक्रिया साडेतीन वाजेपर्यंत सुरू होती, त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला इच्छुकाच्या नावाची यादी मागविली. यामध्ये पंधरा लोकांची नावे होती, त्या सर्वांची नावे प्रदेश स्तरावर पाठविण्यात आली व त्यातन नितीन काळे यांच्या नावावर एकमत झाल्याचे घोषित करण्यात आले. श्री. काळे यापुर्वीही जिल्हाध्यक्ष राहिलेले असून सत्ताकाळातील सुरुवातीच्या काही महिन्यात त्यानी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदावर त्यानी आतापर्यंत काम केले आहे.
  भाजपच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन काळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ निडवदे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. ऐनवेळी दिग्गज नावे आल्याने निवडीच्या प्रक्रियेला वेळ लागल्याचे दिसून आले, पण नितीन काळे यांनी बाजी मारत अनेकांना धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या प्रक्रियेकडे गेल्या काही दिवसापासून अनेकांचे लक्ष लागून राहिले होते, त्यातही एकदा तारीख जाहीर करुन शिवाजीराव चालुक्‍य यांच्या निधनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. शनिवारी ही प्रक्रिया पार पडली असली तरी शुक्रवारी रात्रीपासुन दोन गटामध्ये तीव्र स्पर्धा सूरु झाल्याचे चित्र होते.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटाचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील यांचे नाव स्पर्धेत आल्याने जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली होती. आमदार पाटील यांनी नेताजी पाटील यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र त्यात त्याना यश आले नाही.अस असले तरी जुन्या भाजपच्या इच्छुकापैकी नितीन काळे यांचे नाव आमदार पाटील यांच्यासाठी सोयीचे असल्याने त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमदार सुजीतसिंह ठाकुर यांनी शेवटपर्यंत गुप्तता ठेवल्याचे दिसुन आले. 

दुपारी एक वाजता होणारी निवड प्रक्रिया साडेतीन वाजेपर्यंत सुरू होती, त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला इच्छुकाच्या नावाची यादी मागविली. यामध्ये पंधरा लोकांची नावे होती, त्या सर्वांची नावे प्रदेश स्तरावर पाठविण्यात आली व त्यातन नितीन काळे यांच्या नावावर एकमत झाल्याचे घोषित करण्यात आले. श्री. काळे यापुर्वीही जिल्हाध्यक्ष राहिलेले असून सत्ताकाळातील सुरुवातीच्या काही महिन्यात त्यानी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदावर त्यानी आतापर्यंत काम केले आहे.

नगरपालिका निवडणुकीमध्ये श्री. काळे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवून चांगली मते घेतली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या मतामुळे सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता.

आमदार पाटील यांनी आपल्या गटाला अध्यक्षपद मिळावे यासाठी प्रयत्न केला होता,पण पक्षाचे धोरण पाहता नवीन लोकांना संघटनेचे महत्वाचे पद इतक्‍या लवकर दिले जात नाही. त्याचा फटका नेताजी पाटील यांना बसल्याचे दिसुन येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com