नितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन  - Nitin Gadkary Says I am Fully Fit Appeals People to Stay at Home | Politics Marathi News - Sarkarnama

नितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 एप्रिल 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळल्याने चार दिवसांपूर्वी त्यांच्या शरिरात चार दिवसांपूर्वी एक स्टेंट टाकण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बाब असल्याने तसेच भेटणाऱ्यांचा त्रास होऊ नये याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कोणाला दिली नाही. फक्त एकच दिवस ते इस्पितळात होते.

नागपूर : अँजिओप्लास्टी झाल्याच्या वार्तेन चिंतेत आपल्या चाहत्यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपण एकदम फिट असल्याचे सांगून दिलासा दिला. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळल्याने चार दिवसांपूर्वी त्यांच्या शरिरात चार दिवसांपूर्वी एक स्टेंट टाकण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बाब असल्याने तसेच भेटणाऱ्यांचा त्रास होऊ नये याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कोणाला दिली नाही. फक्त एकच दिवस ते इस्पितळात होते. मात्र अँजिओप्लास्टीचे वृत्त फुटले. त्यामुळे अनेकजण चिंतेत पडले होते. नेमके काय झाले आणि केव्हा झाल विचारपूस केली जात होती. 

संबंधित लेख