आजचा वाढदिवस -  नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री - Nitin Gadkary Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस -  नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 मे 2018

आजचा वाढदिवस - 

नितीन गडकरी 
ता. 27 मे 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार व महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर मतदारसंघातून पावणेतीन लाख मतांच्या मताधिक्‍यांनी विजय नोंदविला. मोदी मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून सामील झाले. काम करणारा नेता म्हणून त्यांची आज देशात ओळख आहे. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार व महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे नेतृत्वही त्यांनी केले. तेव्हापासून ते भाजपचा युवा नेता म्हणून विदर्भात नावारूपाला येत होते. 1985 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पश्‍चिम नागपूर विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांचा पराभव झाला परंतु 1989 मध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर सलग पाच वेळा ते याच मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले. 

या काळात 1995 मध्ये ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे तयार केल्याने त्यांचे राष्ट्रीय पातळीवर नाव झाले. 1999 मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांची 2012 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपूर मतदारसंघातून पावणेतीन लाख मतांच्या मताधिक्‍यांनी विजय नोंदविला. मोदी मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून सामील झाले. काम करणारा नेता म्हणून त्यांची आज देशात ओळख आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख