सर्वाधिक खर्च नितीन गडकरींचा, पाठोपाठ  पटोले दुसऱ्या क्रमांकावर

..
nitin_gadkari_nana_patole
nitin_gadkari_nana_patole

नागपूर : नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक रक्कम भाजप उमेदवार नितीन गडकरींनी खर्च केली. त्यांच्या पाठोपाठ कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे.

दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांपेक्षा जास्त असले तरी खर्चातील तफावत फक्त 80 हजारांची आहे. गडकरींनी मागील निवडणुकीच्या तुलनते जवळपास 20 लाखांची अतिरिक्त रक्कम यावेळी खर्च केली आहे.

यंदाची लोकसभा निवडणूक आतापर्यंतची सर्वाधिक खर्चिक असल्याचे बोलले जाते. नागपूर लोकसभा निवडणुकीत 30 उमेदवार रिंगणात होते. यातील 29 उमेदवारांनी निवडणूक विभागाला खर्चाची माहिती दिली आहे.

यानुसार 1 कोटी 75 लाख 17 हजार रुपये उमेदवारांनी खर्च केले. प्रत्यक्षात हा खर्च शंभर कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे. गडकरींना या निवडणुकीत 6 लाख 60 हजार 221 मत मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना 4 लाघ 44 हजार 212 मते मिळाली.

गडकरींनी निवडणूक विभागाला दिलेल्या माहितीनुसार 44 लाख 88 हजार 041 रुपये खर्च केले. त्यांना मिळालेली मत लक्षात एक मतासाठी त्यांना जवळपास 6 रुपये 79 पैसे खर्च आला. तर नाना पटोले यांनी एक मतासाठी 9.91 रुपये खर्च केले. त्या पाठोपाठ बसपचे मोहम्मद जमाल 31 लाख 75 हजार 934 रुपये, तर वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे 25 लाख 39 हजार 536 रुपये, बीआरएसपी ऍड. सुरेश माने यांनी 10 लाख 36 हजार 770 रुपये खर्च केले.

काही उमेदवारांनी 14 हजार रुपयांच्या घरातच खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली आहे. जमाल यांना एका मतासाठी 100 रुपये तर डबरासे यांनी 97 रुपये खर्च केले. माने यांना एक मतासाठी 303 रुपये खर्च आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com