'फक्त एकदा तिकीट द्या' म्हणणारे यावेळी पुन्हा मागे लागले : गडकरी

.
Nitin_Gadkari.
Nitin_Gadkari.

नागपूर : " फक्त यावेळी विधानसभेची तिकीट द्या, मग पुढच्या वेळी नाही म्हणणार, असे 2014 च्या निवडणुकीत  म्हणणारे आमदार झाले . आता  तुमचा आशिर्वाद असेल तर यावेळी पुन्हा लढू, असे म्हणत आहेत ",असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

बुधवारी  भाजपच्या विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते .विशेष म्हणजे 'हे' आमदार यावेळी मंचावर विराजमान होते. त्यामुळे भाजपच्या 'या' आमदारांना यावेळी उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली.

श्री. गडकरी  पुढे म्हणाले,   ''निवडणुकीच्या तोंडावर आशिर्वाद मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचा अर्थ कार्यकर्ते इलेक्‍शन मोडवर गेले आहेत. राजकीय पक्षात येताना राजकारणात मोठ्या पदाला गवसणी घालण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. तिकीट मागणे हा कार्यकर्त्यांचा नैसर्गीक अधिकार आहे.''

"एका मतदारसंघात एकालाच तिकीट देता येते. ही बाब कार्यकर्त्यांनी समजून घ्यावी. बरेच वर्ष काम करणारे कार्यकर्ते येतात आणि म्हणतात, 'माझ्यात काय कमी आहे, मला का तिकीट नाही'. (असे म्हणणारेही मंचावर हजर होते) अशा वेळी कार्यकर्त्यांची समजूत काढणे फार अवघड असते. पण तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांना समजविण्याचा माझा अनुभव एव्हाना दांडगा झाला आहे ,: असे  गडकरींनी आपल्या खुमासदार शैलीत सांगितले.

यावेळी सभागृहात एकच हंशा पिकला. सर्वांपेक्षा पक्ष मोठा आहे. त्यामुळे पक्ष ज्याला तिकीट देईल, त्याच्यामागे कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा घेऊन संपूर्ण ताकदीनिशी उभे रहावे, असे आवाहन गडकरींनी कार्यकर्त्यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com