मी म्हणालो होतो ना, क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं !

..
Nitin_Gadkari
Nitin_Gadkari

नागपूर :  क्रिकेट आणि राजकारणात अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा गेम पालटू शकतो आणि काहीही होऊ शकते. मागे मी आपल्याला हे सांगितलं होतं ते आज तुम्हाला पटले असेल, असे नितीन गडकरी आज म्हणाले. 


खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या महिन्याभरापासून पत्रकारांसह सामान्य जनतेला चिंता लागली होती सरकार कोणाचे येणार, कसं येणार, काय होणार त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राला दिली आहेत.

राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत देवेंद्र फडणवीस आपला बहुमत सिद्ध करतील आणि एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देतील, याचा मला विश्वास आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com