केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रदेश भाजपला आली आठवण

..
bjp-flex-with-gadkari
bjp-flex-with-gadkari

नागपूर  : भाजपच्या पोस्टरवरून गायब झालेल्या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची प्रदेशच्या नेत्यांना पुन्हा आठवण झाली असून आता त्यांचा फोटो पुन्हा भाजपच्या पोस्टरवर दिसू लागला आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या वेळी फडणवीस यांनी जाहीर  केला. तसेच सरकारवर टीका करत सत्ताधारी या अधिवेशनाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेवेळी पाठीमागे लावलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा सहा जणांची छायाचित्रे होती.

महाजनादेश यात्रेवेळेस पोस्टरवरून गायब झालेले नितीन गडकरी आज विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेच्या पोस्टर्सवर पुन्हा झळकले. त्यामुळं विरोधी बाकावर आल्यानंतर पक्षाला गफकरींची आठवण आली का अशी चर्चा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात रंगली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीत अनेक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीची चर्चा रंगली. आजच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलरांसह विनोद तावडे आणि पंकजा मुंडे गैरहजर राहिले. मात्र यापैकी काही नेत्यांशी संपर्क साधला असता खाजगी कारणांमुळे उपस्थित राहता आलं नसल्याचं कारण त्यांनी दिलं. तसेच कुठलीही नाराजी नसल्याचंही स्पष्ट केलं.

सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली, सावरकर यांचा अपमान खपवून घेत  आहे, अधिवेशन टाईमपास होत आहे. मंत्रीच नाही, त्यामुळे काम नाही. हे स्थगिती  सरकार आहे, असा आरोप फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com