जहाज उद्योगात विकासाची अफाट क्षमता  : नितीन गडकरी 

nitin-gadkari
nitin-gadkari

पोर्ट ब्लेअर      :  जहाज उद्योगात अफाट क्षमता असून, सागरमाला प्रकल्पांतर्गत सागरी मार्ग, बंदरनिर्मितीसारखे विविध विकास प्रकल्प हाती घेता येतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

पोर्ट ब्लेअर व बरातांग बेटांना जोडणाऱ्या सागरी मार्गाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, "सागरमाला प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, त्यापैकी 4 लाख कोटी रुपये बंदरे, रेल्वे आणि रस्तेजोड प्रकल्पांवर खर्च केले जाणार आहेत. याबरोबर देशातील 12 मुख्य बंदरांचे आधुनिकीकरण करण्याचाही केंद्र सरकारचा मानस आहे. याबरोबरच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कोचीन व गोवा शिपयार्ड यांचे सक्षमीकरण करण्याची योजनाही आखण्यात आली आहे.'' 

मागील दोन वर्षांच्या (4 व 5 हजार कोटी) तुलनेत चालू वर्षी जहाज उद्योगातून 7 हजार कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. जहाज उद्योगात खासगी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मोठी संधी असून, गुंतवणूक वाढीमुळे आपसूक रोजगार व महसूलनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. सागरी मार्ग प्रकल्पांमध्ये देशातील 111 नद्यांचा समावेश करण्यात आला असून, आगामी काळात याची व्याप्ती वाढविली जाणार असल्याची माहितीही गडकरींनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com