नितीन गडकरींची नागपूर मनपा अधिकाऱ्यांना तंबी 

नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टिका करीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाच्या संथ गतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नितीन गडकरींची नागपूर मनपा अधिकाऱ्यांना तंबी 

नागपूर : शहरातील सिमेंट रस्त्यांचा आराखडा सदोष तयार करण्यात आला, अशी टिका करीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामाच्या संथ गतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज वनामती येथे शहरातील विविध विकास कामे, प्रस्तावित प्रकल्प, प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. 

यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दिक्षित, मनपा आयुक्त अभिजित बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, नासुप्र सभापती शीतल उगले, राष्ट्रीय महामार्ग, नासुप्र, मनपा, मेट्रो, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी शहरातील सिमेंट रस्ते उंच झाले असून त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने ते लोकप्रतिनिधींच्या घरावर चालून येत असल्याकडे आमदार सुधाकर देशमुख यांनी लक्ष वेधले. रस्ते उंच केलेच, परंतु पावसाळी नाल्या तयार केल्या नाही, ज्या केल्या त्या सदोष असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर गडकरी यांनी पावसाळ्यात कुणाच्याही घरात पाणी शिरू नये, याबाबत कुठलीही दिरंगाई होता कामा नये, अशी तंबी गडकरींनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com