पंतप्रधानांना चोर म्हणणे जनतेला पटले नाही : नितीन गडकरी

पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचे नाहीत, तर देशाचे असतात. पंतप्रधानांना उद्देशून चोर म्हणने योग्य नव्हते. जनतेलाही ते पटले नाही. जनतेने पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा भरतीय जनता पक्षाला संधी दिली आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
पंतप्रधानांना चोर म्हणणे जनतेला पटले नाही : नितीन गडकरी

नागपूर : पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचे नाहीत, तर देशाचे असतात. पंतप्रधानांना उद्देशून चोर म्हणने योग्य नव्हते. जनतेलाही ते पटले नाही. जनतेने पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा भरतीय जनता पक्षाला संधी दिली आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमसंदर्भात प्रश्‍न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, कुणी मानो अथवा न मानो. जनतेने आपला कौल भाजपाच्या बाजूने दिला आहे. लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च आहे. तो सर्वांनी मोठ्या मनाने स्वीकारायला हवा. काही नेते मात्र दिवसभर टिव्हीसमोर बसून चर्चा करीत आहेत. जिंकले तर ईव्हीएम चांगली आणि हरले तर वाईट, ही विरोधकांची भूमिका योग नाही. राजकारणात जाणकार असणारे शरद पवार यांनी हार स्वीकारली, हे चांगले झाले.

लोकशाहीत जनता सर्वोच्च आहे. मतदारांनी सर्वच पक्षांचे ऐकून घेत मत कुणाला द्यायचे, याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेला विकास बघून जनतेने पुन्हा कामाची संधी दिली आहे. नागपूरकरांनीही पुन्हा एकदा संधी दिली. त्यासाठी जनतेचे आभार. येणाऱ्या दिवसांमध्ये विकासाच्या दृष्टीने भारत आणखी गतीने पुढे जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

मी कधीही जातीपातीचा आधार घेतला नाही, जे कामाच्या आधारे निवडून येऊ शकत नाही, तेच जातीपातीचा विचार करीत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

देशात पाण्याची समस्या मोठी आहे. पुढच्या काळात पाण्याच्या समस्येला महत्त्व दिले जाईल. देशात `जलशक्ती' हा नवीन विभाग सुरू करण्यात येईल. देशात रस्त्याचे जाळे विणले गेले. त्याच धर्तीवर पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. `पॉवर ग्रीड'च्या धरतीवर देशात वॉटरग्रीड सुरू केले जाई, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com