nitin gadkari birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : नितीन गडकरी - माजी केंद्रीय मंत्री.

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मे 2019

ते एक यशस्वी शेतकरी आणि उद्योजकही आहेत. नागपुरच्या महाल परीसरात त्यांचे बालपण केले. त्यांचे शिक्षणही येथेच झाले.
विद्यार्थीदशेतच त्यांना आपल्यातील नेतृत्वाची चुणूक दाखविली होती.

ते एक यशस्वी शेतकरी आणि उद्योजकही आहेत. नागपुरच्या महाल परीसरात त्यांचे बालपण केले. त्यांचे शिक्षणही येथेच झाले.
विद्यार्थीदशेतच त्यांना आपल्यातील नेतृत्वाची चुणूक दाखविली होती.

विधानपरीषद सदस्य, नागपुरचे पालकमंत्री ते केंद्रीय मंत्री अशी देदिप्यमान त्यांची कारकीर्द सुरु आहे.  ते चार वेळा नागपूर पदवीधर
मतदारसंघातून विधानपरीषदेवर निवडून आले आहेत. 1995 ते 1999 ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बाधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते.
या काळात त्यांना महाराष्ट्राचा कायाकल्प करुन दाखविला. गेल्या पाच वर्षात केंद्रीय भुपृष्ट वाहतूक आणि जहाजबाधणी मंत्री म्हणूनही
त्यांनी देशभराच परीवर्तनाची कामे केली. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन लाखांहून अधिक मताधिक्‍य घेऊन विजयी झाले. 

नितीन गडकरी यांनी केंद्रात आणि राज्यात त्यांचा कामाच ठसा उमटविलेला आहे. त्यामुळे देशभरात त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.  कुठल्याही कौटुंबिक किंवा राजकीय वारसा नसताना केवळ स्वबळावर त्यांनी ही राष्ट्रीय पातळीवर झेप घेतलेली आहे. 

अशा या कर्मयोगी नेत्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा !
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख