nitin gadkari and nagar | Sarkarnama

नितीन गडकरी यांना नागपुरला हलवणार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

राहुरी विद्यापीठ (नगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठात दीक्षांत भाषणांनंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर येऊन ते स्टेजवरच खाली कोसळले. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र ते पुन्हा कोसळले. डॉक्‍टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व दीक्षांत समारंभातून पायी चालत बाहेर पडले. शिर्डी दौरा रद्द करण्यात आला आहे. 

प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापीठाच्या विशेष अतिथीगृहाकडे ते रवाना झाले. तेथे त्यांच्या पुढील चाचण्या करण्यात आल्या. रक्तातील साखर कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विशेष विमानाने नागपुरला हलवण्यात येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख