गडकरींना माध्यमांना दूर ठेवले : सत्तास्थापनेच्या घडामोडींवर मौन

भाजपच्या सत्तास्थापनेच्या खेळापासूनगडकरी दूरच!
गडकरींना माध्यमांना दूर ठेवले : सत्तास्थापनेच्या घडामोडींवर मौन

पुणे : दिवसभर पुण्यात असलो तरी माध्यमांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका घेत एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज माध्यमांना दूर ठवले. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत असताना गडकरी काहीच बोलत नाहीत, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील कात्रज-वडगाव बाह्यवळण मार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज गडकरी यांच्या हस्ते झाला. या निमित्त आज ते जवळ-जवळ दिवसभर पुण्यात होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळीच त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला असता गडकरी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भूमिका स्पष्ट केली. आज पुण्यात दिवसभर आहे. मात्र, माध्यमांशी बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्यात शिवसेना व दोन्ही कॉंग्रेस एकत्र येत सरकार बनविण्याची तयारी करीत आहेत. भाजपाचे नेतेदेखील भाजपाचेच सरकार येणार असे वारंवार सांगत आहेत. मात्र, भाजपाचे 105 व त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 15 इतकी आहे. त्यामुळे 119 आमदारांच्या जोरावर भाजपा सरकार कसे बनवणार. 26 आमदार कुठून आणणार हे मात्र, हे नेते सांगायला तयार नाहीत. गेल्या आठवड्यात गडकरी यांनी भाजपाचे सरकार स्थापन होण्यासाठी काही प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यादिवशीपासून गडकरी यांनी राज्यातील सत्ता स्थापनेच्या विषयावर बोलण्याचे टाळले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com