nitin banugade will be shivsena candidate in satara | Sarkarnama

उदयनराजेंना नितीन बानुगडेच टक्‍कर देतील; ठाकरेंकडे तिकीटाचा आग्रह

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून उपनेते आणि सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उदयनराजेंच्याविरोधात भाजपचे पुरूषोत्तम जाधव यांच्यानंतर शिवसेनेतून बानुगडे-पाटील हे रिंगणात येवू शकतात. 

सातारा लोकसभा मतदारसंघावरे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादीतून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. तरीही शरद पवार कोणाचे नाव निश्‍चित करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सर्वानुमते एकच नाव निश्‍चित करून ते पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविले आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून नितीन बानुगडे-पाटील यांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख