nitin banugade patil political journey | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

ब्रिगेडमार्गे शिवसेनेत आलेल्या बानुगडेंना आता कुठे फुलाची पाकळी मिळालीय! 

संपत मोरे 
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांची निवड झाली आहे. 2014 साली बानुगडे शिवसेनेत गेल्यावर त्यांना आमदारकी मिळणार, अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांत सुरु होत्या. पण आता प्रत्यक्षात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद त्यांना मिळाले आहे. 

पुणे: कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांची निवड झाली आहे. 2014 साली बानुगडे शिवसेनेत गेल्यावर त्यांना आमदारकी मिळणार, अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांत सुरु होत्या. पण आता प्रत्यक्षात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद त्यांना मिळाले आहे. 

नितीन बानुगडे यांचा मूळ पिंड अभ्यासकाचा. वक्‍तृत्व, नाटय या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केलीय. महाराष्ट्रातील तरुणाईवर त्यांच्या वक्तृत्वाचा मोठा प्रभाव आहे. संभाजी ब्रिगेडच्या शाखा जेव्हा सातारा सांगली जिल्हयात स्थापन होत होत्या त्याकाळात बानुगडे संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवरून भाषणे करायचे. ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नव्हते पण त्यांचे ते समर्थक होते. सिंदखेडराजा येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. या कार्यक्रमातील त्यांची भाषणे खूप गाजली होती. 

नंतरच्या काळात ते संभाजी ब्रिगेडपासून थोडे दूर गेले. 2014 च्या दरम्यान ते शिवसेनेत गेले तेव्हा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज झाले. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली या निवडणुकीच्या प्रचारासाठी बानुगडे यांनी राज्यभर सभा घेतल्या. शिवसेनेची भूमिका त्यांच्या शैलीत लोकांना सांगितली. या सभा परिणामकारक ठरल्याची प्रतिक्रिया शिवसैनिक द्यायचे. शिवसेनेत बानुगडेंना पहिल्यांदा सांगली सातारा संपर्कप्रमुख नंतर उपनेते अशा जबाबदाऱ्या मिळाल्या.

पक्षातील पदे त्यांना मिळाली, त्या पदांना त्यांनी न्याय मिळवून दिला. पण त्यांना आमदारकी मिळावी अशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची भावना होती. अधूनमधून तशा चर्चाही व्हायच्या. कालच त्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. हे पद मिळाल्याचा बानुगडेप्रेमींना आनंद आहेच पण त्यांना आमदारकी मिळावी अशीही त्यांची इच्छा आहे त्यामुळे सरांना आता पाकळी मिळाली आहे फुलही लवकर मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख