पाकिस्तानप्रमाणेच शिवसेनेचीही विश्वासार्हता संपली : नितेश राणेंची टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्वबळावर लढणार असून महाराष्ट्रातील औरंगाबाद, सिंधुदूर्ग-रत्नागिरी, ईशान्य मुंबई, ठाणे, अमरावती या पाच जागा पक्षाकडून लढल्या जातील. भाजप, शिवसेना पक्षातील नाराज नेतेमंडळी आमच्या पक्षात यायला इच्छुक असून त्यांचा विचार त्या जागांसाठी केला जाईल, अशी माहिती नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी त्यांनी शिवसेनेवरही कठोर शब्दात टीका केली.
Nitesh Rane - Uddhav Thakre
Nitesh Rane - Uddhav Thakre

औरंगाबाद, सिंधुदूर्ग-रत्नागिरी, ईशान्य मुंबई, ठाणे, अमरावती या पाच जागा महाराष्ट्र स्वाभीमान पक्ष लढवणार

सोलापूर  : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्वबळावर लढणार असून महाराष्ट्रातील औरंगाबाद, सिंधुदूर्ग-रत्नागिरी, ईशान्य मुंबई, ठाणे, अमरावती या पाच जागा पक्षाकडून लढल्या जातील. भाजप, शिवसेना पक्षातील नाराज नेतेमंडळी आमच्या पक्षात यायला इच्छुक असून त्यांचा विचार त्या जागांसाठी केला जाईल, अशी माहिती नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी त्यांनी शिवसेनेवरही कठोर शब्दात टीका केली.

पक्षबांधणी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नितेश राणे शनिवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी ते म्हणाले, "पाकिस्तानबद्दल भारतीयांची विश्‍वासार्हता संपली आहे, त्याप्रमाणे शिवसेनेची विश्‍वासार्हता संपली आहे. टोकाची टीका करुनही शिवसेनेने भाजपसमवेत युती केली. परंतु, जनता मुर्ख नाही आणि तसे शिवसेनेने समजूही नये. शेतकरी, कामगारांचे प्रश्‍न आणि मराठा, धनगर, मुस्लीम समाजासह अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर आपला फोकस असेल." आता राम मंदिराचा प्रश्‍न बाजूला पडला असून पाकिस्तानवर एखादी कारवाई केली की, जनता आपोआप मतदान करेल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचेही ते म्हणाले.

मनसे फक्‍त यु टर्न पुरती मर्यादित
"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे नेते म्हणून खूप चांगले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी अथवा संघटना बांधणीसाठी वेळ द्यायला हवा होता. परंतु, शिवाजी पार्क आणि दादर यापुरतीच मनसे मर्यादित राहीली. त्याच परिसरात त्यांची गाडी यु टर्न घेते," असा टोला नितेश राणे यांनी यावेळी लगावला.

सुशिलकुमार शिंदे मार्केटिंग मध्ये कमी पडले
दहशतवादी अजमल कसाब ला फाशी दिल्याची मोठी घटना होती. त्याचे मोठे मार्केटिंग करता आले असते परंतु, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी तसे केले नाही. भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसने खूप कामे केली असतील. परंतु, भाजपने मार्केटिंगवर सर्वाधिक भर दिला. प्रत्येक सरकारची रणनिती वेगळी असते.''

ठळक मुद्दे
- महाआघाडीचा पहिला मेळावा नांदेड मध्ये हेच दुर्दैव

- आगामी निवडणुकांमध्ये सोशल मिडियाचा सर्वाधिक वापर होणार

- कॉंग्रेसने कामे खूप केली परंतु, मार्केटिंगमध्ये पिछाडीवर

- पाकिस्तानला मैदानात लोळवा, त्यांच्या खेळाडूंचे चेहरे पहायला भारतीयांना आवडेल

- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ फसवे

- तरुणांना कर्ज नाकारणाऱ्या बॅंका फोडाव्या लागतील

नितेश राणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com